म्हसळा - प्रतिनिधी
"शिकाल तर टाकाल"हे ब्रीदवाक्य सत्यात उतरविण्यासाठी सर्व सामान्य समाज घटकांचा कळ शिक्षण घेण्याकडे जास्त दिसुन येत आहे.याचा प्रत्यय म्हसळा तालुक्यातील कोळे पंचक्रोशीतील राजीप केंद्र शाळेत बघायला मिळाला आहे.गेली दीड दोन वर्ष कोव्हिड -19 प्रादुर्भावाचे महामारीमुळे शाळा बंद आहे त्यातच 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ आणि या वर्षी झालेल्या तौक्ते वादळात शाळा इमारत आणि परिसर नादुरुस्त व अस्वच्छ झाला असल्याने कोळे गावातील आदिवासी मुलांचे पालकांनी स्वच्छेने शाळा परिसरात स्वच्छ करण्याचा आदर्शवत काम केले आहे.निसर्गाच्या सानिध्यात वसलेली कोळे प्राथमिक शाळा सुंदर आणि नीटनेटकी राहिली तर आपलीच मुलबाळ आवडीने शाळेत येतील शिकून सवरुन मोठी झाल्यावर शाळेचे आणि गावचे नाव उज्वल करतील या मधूनच एक नवा आदर्श घडेल.या कामी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील गुरुजी यांचे आदर्श ठेऊन कोळे आदिवासीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता गणेश जाधव, ग्रा.पं.कर्मचारी निमेश पवार, अंगणवाडी सेविका मीना पालांडे यांच्या सहकार्याने आदिवासी समाज महिलामंडळीने शाळा आणि अंगणवाडी परिसर स्वच्छ करण्याचा अभियान राबवला आहे.या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून आदिवासी समाजाचे अभिनंदना व कौतुक होत आहे.
"ही आवडते मज मनापासून शाळा,लावीते लळा जसा माऊली बाळा" या काव्यपंक्तीचा भावार्थ कोळे शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटील आणि उपशिक्षक वसंत विनायक बिरादर यांनी आदिवासी समाज घटकाच्या मनावर बिंबवुन त्यांना शिक्षण,स्वच्छता,सामाजिक उपक्रम यांच्यातील महत्त्व समजावुन त्यांच्या पाल्याना शाळा शिकण्याची गोडी आणि उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे कार्य सुरू ठेवले असल्याचे समाजसेवक दिनेश काप यांनी कौतुक करताना सांगितले.
Post a Comment