संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत दिवसांत केवळ २ रुग्ण पॉझीटीव्ह मिळाले तर आज ११रुग्ण बरे झाल्याचे प्रभारी तहसीलदार के.टी. भिंगारे यानी कळविले आहे.तालुक्यांत आजपर्यंत एकूण बाधीत रुग्ण ८९३, उपचार घेत असलेले रुग्ण ६० , आजपर्यंत मृत्यू पावलेले ४५,आतापर्यंत ७८८रुग्ण बरे झाले आसल्याचे प्रसीध्दी पत्रकात म्हटले आहे. आज म्हसळा तालुक्यांत २नवीन रुग्ण आहेत पाभरे व आंबेत या ग्रामिण भागातील प्रत्येकी एक आहेत. उपचार घेत असलेल्या ६० रुग्णांपैकी ५१ जण घरीच विलगीकरण(Home Isolation) होऊन उपचार घेत आहेत तर २ श्रीवर्धन उप जिल्हा रुग्णालय, ५ DCHC म्हसळा, २ जण खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आसल्याचे सांगण्यात आले. बाधीत रुग्णांपैकी म्हसळा शहर २९ पाभरे ९, देवघर ५, मेंदडी ४,वारळ, आंबेत प्रत्येकी २, कणघर,सावर तोंडसुरे,संदेरी, गोंडघर, सुरई, सकलप,खामगाव गौळवाडी, कोंझरी येथील प्रत्येकी १ रुग्ण बाधीत आहे.
"म्हसळा शहरांत ४५ खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ (डीसीएचसी) सुरू करण्यात आले आहे.तरी सुद्धा बाधीत राग्णांपैकी तब्बल ८५% रुग्ण घरीच विलगीकरण (Home Isolation) करतात यामुळे संक्रमणात वाढ होण्याची शक्यता आहे"
Post a Comment