सचिन खोपकर : म्हसळा
संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा संदेश " वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे वनचरे " हा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणला तो आडी बौध्दजन आणी रोहिदास उन्नती मंडळ यांच्या उत्साही कार्यकर्ते आणी स्थानिक मंडळानी.तसे पाहता आडी हे गांव श्रीवर्धन आणी म्हसळा यांच्या सीमेवर , डोंगरदऱ्यात आणी निसर्गाने मनसोक्त उधळण केलेले आणी सुप्रसिध्द सावित्री नदीच्या काठावर वसलेले म्हसळा तालुक्यातील आदर्श असे आडी गांव .या गावचे वैशिष्ट म्हणजे गावातील बौध्द समाज आणी रोहिदास समाज यांच्या प्रबोधन विचारसरणीतून गावांमध्ये बौध्द समाज आणी रोहिदास समाज यांचे सयुक्त मंडळ .या मंडळाच्या माध्यमातून गेल्या वर्षी म्हणजे 0३ जून २०२० रोजी जे निसर्ग नामक महाभयंकर चक्रीवादळ आले त्या मध्ये रायगड जिल्ह्याचे फार मोठी वीत्य हानी झाली , अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले , शेकडो झाडे मुळासकट उमलून जमीनदोस्त झाली .ही हानी कधीही भरून न येणारी आहे .परंतु आडी गावातील बंधूंनी हार मानली नाहीं .त्यानी चंग बांधला की जरी निसर्ग चक्रीवादळाने शेकडो झाडे पाडली असली तरी ह्या वर्षी त्याच्या पेक्षा जास्त झाडे पुन्हा लाऊ आणी जगवू .त्या प्रमाणे आडी बौध्दजन आणी रोहिदास उन्नती मंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २० जून २०२१ रोजी स्थानिक ठिकाणी मुक्काम आडी , तालुका म्हसळा , जिल्हा रायगड येथे वृक्ष रोपनाचा भव्य दिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणी आनंदी वातावरणात पार पडला .ह्या कार्यक्रमाला प्रमुख आणी उल्लेखनीय उपस्थिति लाभली ती म्हणजे , आडी गावचे विद्यमान सरपंच महोदय आदरणीय आयु .प्रकाश म्हसकर साहेब , माजी सरपंच महोदय आयु.मधुकर पवार साहेब ,आडी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आयु बापू तांबीटकर , आडी मधली वाडी ग्रामस्थ मंडळाचे स्थानिक अध्यक्ष आयु .राजेन्द्र भोगल साहेब आणी गावातील ईतर मान्यवर , लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सहभागी झाली होती .
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आयु .सचिन खोपकर साहेब यांनी जातीने स्वतः उपस्थित राहून कार्यक्रम सुंदररित्या पार पाडला .त्यांना उत्तमरीत्या सहकार्य केले ते मंडळाचे सरचिटनिस आयु .संतोष गमरे , उपाध्यक्ष आयु .राजेश गमरे ,उपाध्यक्ष आयु .दिपक गमरे , अनिल गमरे , आदेश गमरे , दिपक खोपकर , गोविंद गमरे आणी विशेष उपस्थिती आणी मौलिक मार्गदर्शन आणी प्रत्यक्षात सहभाग लाभला ते मंडळाचे जेष्ठ सल्लागार आयु .संदेश गमरे , रवींद्र गमरे , आनंद गमरे यांच्या प्रमुख उपस्थित वृक्ष रोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणी दरवर्षी असाच कार्यक्रम करण्याचा संकल्प करून
"वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे वनचरे " हा पर्यावरणाचा समतोल राखून प्रत्येकाने एक तरी झाड लावा आणी झाड जगवा हा संदेश आणी एक चांगला पायंडा आडी बौध्दजन आणी रोहिदास उन्नती मंडळाने दिला आहे .
Post a Comment