माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार आणि व्यंगचित्रकार रविंद्र कुवेसकर यांची एकमताने माणगांव येथे झालेल्या पत्रकारांच्या सभेत निवड करण्यात आली.
या सभेत माणगांव व रायगड जिल्ह्यातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी या स्वतंत्र पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. रविंद्र कुवेसकर हे तीस वर्षे पत्रकारिता करीत आहेत. त्यांनी आपल्या धारधार लेखणीतून अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांना सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत. ते सतत सामाजिक प्रश्नांवर आपल्या लेखणीतून भाष्य करीत असतात. कोविड जनजागृती, सामाजिक आरोग्य, विविध समस्या लोकांसमोर मांडल्या आहेत. त्यांच्या कडून नेहमीच दर्जेदार लिखाण होत असल्याने संस्थापक अरुण पवार व सहकारी पत्रकारांनी त्याना अध्यक्षस्थानी निवडले. त्यांचे सर्व स्तरांवर अभिनंदन केले जात आहे.
तसेच संस्थापक अरुण पोवार यांच्या मार्गदर्शना-नुसार कार्याध्यक्षपदी - उदय चव्हाण, उपाध्यक्ष - प्रमोद जाधव, सचिव- सुनिल राजभर, खजिनदार-परेश शिंदे, सह-खजिनदार-वैभव सत्वे, जेष्ठ सल्लागार- अनिल मोकाशी, प्रसिद्धी प्रमुख- राम भोस्तेकर व कार्यकारिणी सदस्यपदी पांडुरंग माने, प्रतिक मोरे, चिन्मय म्हापसेकर, निरंजन कळस व जेष्ठ पत्रकार प्रमोद मोहिरे, मुकेश कडू यांची निवड करण्यात आली आहे. युवा-जेष्ठ पत्रकारांच्या या "समस्या तुमची आणि साथ आमची!" अस घोष वाक्य घेऊन स्थापण झालेल्या मा.ता.पत्रकार सेवा संघाचे सर्व स्तरातुन विशेष अभिनंदन होत आहे.

Post a Comment