तळा ठाणे नालासोपारा गाडीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद ; प्रवासी वर्गात समाधान.




तळा -किशोर पितळे- माणगांव आगाराची माणगांव तळेगाव तळा मार्गे ठाणे नालासोपारा बस सुरू करण्यातआली असून सदर गाडीलातळा तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे प्रवाशीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.तालुक्यातील बहुसंख्य चाकरमानी आपले कुटुंंबासह नालासोपारा विरार वसई उपनगरात नोकरी निमित्ताने रहातआहेत शेती, घरदार गावाकडेअसल्याने नेहमी गावाला येणेजाणे सततअसल्याने या बसचा लागलांच लाभ झाला आहे. सदर बस माणगांव येथून सकाळी ९वा. सूटुन खरवली उसर, तळेगाव, तळा, इंदापूर, पेण, पनवेल, ठाणे, नालासोपारा कडे जात असल्याने अनेक प्रवाशांना सदर बसचा लाभ झाला आहे.त्यामुळे महामंडळाच्या उत्पनात वाढ झाली आहे.सदर बसनालासोपारा येथून सकाळी ६वा. सुटून वरील मार्गाने माणगांव येथे १२पोहोचते.सदर बस सुरू केल्याने माणगांव आगार व्यवस्थापकांना आभार व धन्यवाद व्यक्त करीतआहेत.सदर बसकायमस्वरूपी ठेवावीअशी प्रवाशांची मागणीआहे.तळा तालुका डोंगराळ दुर्गम भागात वसला असल्याने एस् टी.सर्व सामान्यांचे दळणवळणाचे एकमेव साधनआहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी एस् टी बस वर अवलंबून आहे. तसेच गेल्या वर्षभरात कोरोना महामारी रोगामुळे बंदकरण्यात आलेल्या ग्रामीण भागातील बसनियमितपणे सुरु करावी अशी प्रवाशांची मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा