म्हसळा ग्रामीण रुग्णालयात समाज सेवक सुहास महागावकर आणि शांताराम घोले यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ व मास्कचे वाटप.
"मान्यवरांच्या हस्ते कोरोना योध्यांचा केला सन्मान".
म्हसळा -अशोक काते
म्हसळा तालुका यादव युवक संघटना संस्थापक अध्यक्ष,निसर्गमित्र,घुम गावाचे सुपुत्र,समाजसेवक सुहास महागावकर आणि महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबईचे विश्वस्त,वाडांबा गावाचे सुपुत्र, समाजसेवक शांताराम घोले यांचा 1 जुन रोजीच्या संयुक्तिक वाढदिवसाच्या निमित्ताने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात समाज मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन मास्कचे वाटप करण्यात आले.याच कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यानी कोरोना प्रादुर्भाव कालावधीत रुग्णांना चांगली सेवा देऊन कोरोना योध्दा म्हणुन काम केल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता,डॉ.किरण कराड,डॉ.सोनाली करंबे,डॉ. मुनिफ लोखंडे,परिचारिका समीक्षा,पुष्पा वारसे,प्रेरणा कदम,सुनिता लेंडे,ममता मोरे,रुपेश कांबळे,श्रीमती जंगम यांचा यथोचित सन्मान करून गौरविण्यात आले.म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता आणि माजी उपसभापती रविंद्र लाड यांनी कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन केले होते.छोटेखाणी आयोजित कार्यक्रमाला माजी उपसभापती मधुकर गायकर,माजी उप सभापती रविंद्र लाड,महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे माजी अध्यक्ष गणेश वाजे,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,बीजेपी मुंबई उपविभागीय उपाध्यक्ष मदन वाजे,नेवरूळ उपसरपंच सुनिल दिवेकर,हॉटेल संघटना सचिव दत्तात्रय लटके,म.या.चॅरिटी ट्रस्ट तालुका सचिव सुजीत काते,नेवरूळ पोलिस पाटील निलेश लटके,समाजसेवक संजय खताते,ट्रस्टी प्रभाकर खताते आदी मान्यवर उपस्थित होते.गेली 10 वर्षे निसर्गप्रेमी,समाज सेवक सुहास महागावकर आणि शांताराम घोले यांचा वाढदिवस म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील गाववाडीवस्तीत वेगवेगळे सामाजिक उपक्रमांनी साजरा होतो.या वेळी कोरोना प्रादुर्भाव कालावधीत अत्यंत साधेपणात मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment