पुष्कर रिळकर : दिवेआगर
श्रीवर्धन तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता गावोगावी जाऊन लसीकरण करण्याचे आव्हान रायगड च्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी बोर्लीपंचतन आरोग्य केंद्राला भेट दिली त्या वेळी केली.त्यांच्या आव्हानाला साथ देत दिनांक ३१ मे रोजी वेळास आगर येथे कोरोना लसीकरण शिबीराचा आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी यांच्या माध्यमातुन करण्यात आला.
या मध्ये वेळास आगर ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद दिसला एकाच दिवसात 45 वर्षे व त्या पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी आज लस घेतली.काल झालेल्या या लसीकरण शिबिरात गावातील 200 हुन अधिक ग्रामस्थांनी लस घेवुन आपले कर्तव्य पार पाडले.वेळास आगर मध्ये नेटवर्क ची समस्या असल्यामुळे या शिबिरासाठी किशोर स्मृती केबल नेटवर्क चे शुभम पाटील यांनी त्वरीत वायफाय सेवा उपलब्ध करुन दिली.
या शिबिरासाठी श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य अधिकारी,परिचारीका,आशा सेविका,तसेच वेळास ग्रामपंचायतीचे सरपंच आशुतोष पाटीव व त्यांच्या मित्रपरिवारांनी खुप मेहनत घेतली.
श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य यंत्रणेणे श्रीवर्धन तालुका कोरोना मुक्त करण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे.हे आरोग्य कर्मचारी गावोगावी जाऊन लसीकरण मोहिम राबवत आहेत या मुळे लसीकरणाचा मंदवालेला वेग बर्या पैकी गती घेत आहे.श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य कर्मचारी गावोगावी राबवत असलेल्या लसीकरण शिबिरा मुळे त्यांचे सर्वच स्थरातुन कौतुक होत आहे.
टाळेबंदी मुळे सर्वसामन्यांना रोजगार नाही या मुळे हाता मध्ये खाण्यासाठी पैसे नसताना लस घेण्यासाठी खाजगी वाहनाने लसीकरण केंद्रावर जाणे सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.यामुळे श्रीवर्धन आरोग्या कर्मचार्यांचे हा उपक्रम कौतुकास्पद आहे. - (श्री.आशुतोष पाटील, सरपंच वेळास)
Post a Comment