कोरोना विषाणू प्रतिबंधनात्मक उपाय योजना अंतर्गत नियमांचे पालन करून नगर पंचायत प्रशासनास सहकार्य करावे - मुख्याधिकारी मनोज उकिर्डे
म्हसळा -प्रतिनिधी
रायगडसह राज्यभरात 15 जुन पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला आहे.नियमितपणे पुर्ण वेळ सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली दुकाने आज पासुन सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.तशा प्रकारची दवंडी म्हसळा नगर पंचायतीने शहरातील सर्व नागरिक,व्यापारी,दुकानदार यांना दिली आहे.कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत मा. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग-रायगड यांनी दिनांक 1 जुन 2021 चे सकाळी 7 वाजले पासुन ते 15 जुन चे सकाळी 7 वाजेपर्यंत नवीन नियमावली लागु केली आहे त्यानुसार म्हसळा शहरातील किराणा, भाजी, फळ, चिकण, मटण, मासळी, रास्तभाव धान्यदुकान, फॅब्रिकेशन काम करणाऱ्या आस्थापना, दुध डेअरी, अवजारे, शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने,सिमेंट,पत्रे,ताडपत्री,विद्युत उपकरणे,हार्डवेअर सामान विक्री करणारी दुकाने लॉक डाऊन असेपर्यंत मर्यादित वेळेतच सुरू राहतील.सर्वांनी शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून म्हसळा नगर पंचायत प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती वजा दवंडी मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी जाहीरपणे दिली आहे.
Post a Comment