तळा -किशोर पितळे
तळा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बाजारपेठ सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासना कडून घेण्यात आला आहे.गेल्या वर्षीपासून १८४ वर विसावलेला कोरोना रुग्ण संख्याकासवगतीने वाढत जाऊन ३४९पोहोचली आहे.१मे२०२१रोजी२५३वर असलेली संख्या ३१मे २०२१ रोजी ३४९झाली आहे. तब्बल ९६रूग्ण वाढले असुन २०मृत्यू पावलेल्या ची संख्या झाली असून मृत्यू दर वाढला आहे.त्यामुळे निश्चितच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात सर्वात कमी कोरोना रुग्णांची संख्या आहे. परंतु मागच्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने तळा तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे मृत्युदर सुद्धा वाढले आहेत. या कारणाने तळा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मोजक्याच वेळेत दुकाने उघडी ठेवण्यासाठी दि. १ जून रोजी मिटिंग बोलावली होती परंतु जिल्हाधिकारी कार्यालया कडून दुकाने दोन वाजे पर्यंतच उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तळा नगरपंचायत मार्फ़त व्यापाऱ्यांना दुकाने दोन वाजता बंद करण्याची सूचना माईकद्वारे देण्यात आली. व्यापाऱ्यांनी त्या आदेशाचे पालन करीत दुपारी दोन वाजता तळा बाजारपेठ पूर्णपणे बंद केली.
Post a Comment