रोहे (वार्ताहर)
रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमाचा झंजावात सुरू असून शनिवार दिनांक 26 जून रोजी सायंकाळी तालुक्यातील ढोकळेवाडी येथील सिको हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रिसॉर्ट मध्ये रिसॉर्ट मालक श्री. अमितभाई ढोलकीया यांच्या विशेष सहकार्यातून वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला.
यावेळी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी घेतली.
यावेळी रोटरी क्लब रोहा सेंट्रल परिवारातील सदस्य,महिला सदस्या व रोटरेक्ट सदस्य उपस्थित होते.
Post a Comment