कोव्हीड 19 मुळे पालक गमावलेल्या पाल्याना मदतीचा हात


कोव्हीड 19 मुळे पालक गमावलेल्या पाल्याना महिला व बालविकास आणी एस ओ एस चिल्ड्रन सोगाव यांच्या वतीने मदतीचा हात
म्हसळा (वार्ताहर)

आज दिनांक 25/06/2021 रोजी म्हसळा तालुक्यातील म्हसळा बौद्धवाडी येथिल कोव्हिड 19 मुळे एक पालक गमावलेल्या पाल्याना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय रायगड व एस ओ एस चिल्ड्रन सोगाव या संस्थेच्या वतीने कोरडे धान्य वाटप करण्यात आले. तसेच वारळ येथील दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मोफत अन्य धान्य वाटप करण्यात आले. या दोनही पालक गमावलेल्या ३ बालकांना एस ओ एस या संस्थेने संगोपण व शिक्षणासाठी वयाच्या १८ व्या वर्षा पर्यंत स्वावलंबी होई पर्यंत सदर ३ बालकांना अलिबाग येथील संस्थे मध्ये पाठविण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी पं.स म्हसळा  वाय एम प्रभे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्यकट बी तरवडे विस्तार अधिकारी सांख्यिकी प्रमोद एम गायकवाड विस्तार अधिकारी शिक्षण संतोष आर शेडगे जिल्हा बाल संरक्षण कक्षेतील अजिनाथ काळे समुपदेशक, व एस. ओ. एस. बालग्राम, सोगाव,अलिबाग अमित नागरे, वरिष्ठ शिक्षण सहहायक संजय कचरे, वरिष्ठ शिक्षण सहहायक, मनिषा देसाई, वरिष्ठ शिक्षण सहहायक, पर्यवेक्षिका  वैष्णवी आर कलबासकर, कनिष्ठ सहाय्यक  अरविंद डी बैनवाड गटसमन्वयक कल्पेश के पालांडे, अंगणवाडी सेविका मनस्वी एम जाधव हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा