अंगणवाडी सेविकांसाठी महिला व्यक्तिमत्त्व विकास व आरोग्य विषयक शिबिर संपन्न


अंगणवाडी सेविकां साठी महिला व्यक्तिमत्त्व विकास व आरोग्य विषयक शिबिर 25 जून रोजी सोनभैरवमंदिर कांदळगाव येथे संपन्न झाले

प्रशिक्षणात पोषण ट्रेकर ॲपबाबत सेविकांना मार्गदर्शन देण्यात आले.


(राम भोस्तेकर पन्हळघर बुद्रुक ) या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून राजेंद्र कडू शिरवली बिट 1  पर्यवेक्षिका सीमा ठाकरे शिरवली  बिट 2 आणि  पर्यवेक्षिका शनिता मदगे उपस्थित होते.
     प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र कडू यांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये पोषण ट्रॅकर ॲप ,अपडेट व्हर्जन डाउनलोड करून लॉगिन करणे, ॲप मध्ये लाभार्थी नोंदणी करणे म भाषा बदल,टंकलेखन याविषयी माहिती दिली. तसेच गर्भवती महिला, स्तनदा माता, मुले 0 ते 6 महिने, मुले 0 महिने ते 3 वर्ष, मुले 3 वर्ष ते 6 वर्ष, किशोरवयीन मुली ईत्यादी विषयावर सविस्तरपणे पी.पी. टी द्वारे , व्हिडिओ चावापर करून नमार्गदर्श केले.
   महिला व्यक्तिमत्त्व विकास, महिलांचे आरोग्य विषयावर ही मार्गदर्शन करण्यात आले. समारोप सत्रात प्रश्नोत्तरे आणि चर्चा सत्र घेण्यात आले यामध्ये महिलांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.या कार्यशाळेत अनेक अंगणवाडी सेविकांनी आपले मनोगत व्यक्त केले .
 या मार्गदर्शन शिबिरात पर्यवेक्षिका एस.जी.ठाकरे मॅडम ,मार्गदर्शक राजेंद्र कडू यांनी खुप छोट्या छोट्या गोष्टी अतिशय सविस्तरपणे मांडल्या, व सर्व शंकांचे निरसन केले.अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळाल्याचे समाधान उपस्थित सर्व सेविका व महिलांनी व्यक्त केले.
     या प्रशिक्षणासाठी सी एस सी राज्य प्रभारी सुयोग दीक्षित , जिल्हा व्यवस्थापक राजेश पाटील तसेच महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी आर. बी .बने मॅडम यांचे विशेष योगदान व सहकार्य मिळाले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सीमा ठाकरे मॅडम यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा