टीम म्हसळा लाईव्ह
कोकण निसर्गाने दिलेले वरदानच जणू, त्यात कोकणातील भात शेती हा प्रमुख आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेला व्यवसाय आहे. पावसावर अवलंबून राहणारा हा व्यवसाय. यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी राजाच्या चेह-यावर आनंद दिसून येत आहे. पेरणीची कामे संपवून शेतकरी राजाला प्रतिक्षा असते ती भात लावणीची, यावर्षी पावसाने मुसळधार सुरुवात केल्यामुळे भात शेतीला पोषकअसे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपारिक जत्रा साजरी करुन शेतकरी राजा शेतामध्ये भात लावणीच्या कामात व्यस्त असताना पाहावयास मिळत आहे.
भात शेतात वयस्कर तसेच तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वटपोर्णिमेचा सण साजरा करुन महिलावर्ग देखील भात लावणीच्या कामात व्यस्त होऊ लागल्या आहेत. माणगांव तालुक्यांतील बहुतांश ठिकाणी भात लावणीच चित्र पाहावयास मिळत आहे.
Post a Comment