टीम म्हसळा लाईव्ह
हिरव्यागार डोंगराच्या कुशीतून कोसळणारा वारळ येथील धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतो.
म्हसळा आणि श्रीवर्धन करांना पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला वारळचा धबधबा पावसाळ्यात निसर्गप्रेमींना खुणावतो.
वारळ धबधबा पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र बरोबरच पर्यटक क्षेत्र म्हणून परिचित होत आहे .
पावसात हिरव्यागार डोंगरदरीत समोर निळ्याशार समुद्र खाडी भात शेतीची खारजमीन बरोबर औध्योगीक वसाहत म्हणून खारभूमीला पाहिलेजाते भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून दत्त महाराजाचे पवित्र स्वयंभू स्थान त्या स्थानावर धबधब्याची संततधार यामुळेच वारळ धबधबा पंचक्रोषित लोकांना आकर्षित करीत आहे .
कोकणात अनेक निसर्गरम्य स्थळे मन आकर्षित करतात अशातच पर्यटकांना खुणावतोय वारळ गावचा धबधबा...!!
Post a Comment