ॲड. निलेश रातवडकर यांची भाजपा तळा तालुकाध्यक्ष पदी निवड


किशोर पितळे : तळा 

             भारतीय जनता पक्षाच्या तळा तालुका अध्यक्षपदी ॲड. निलेश रातवडकर यांची निवड करण्यात आली आहे. कैलास पायगुडे यांनी भाजप तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते यांनी ॲड. निलेश रातवडकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या पत्नी ॲड. दिव्या रातवडकर यांनी तळा ग्रामपंचायत असताना सरपंच पद भूषविले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासात्मक निर्णय घेतले. काही महिन्यांपूर्वीच या दोन्ही दाम्पत्यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. तसेच सुरुवातीपासूनच त्यांनी पक्षकार्यात स्वतःला झोकून दिले होते. 

                        ॲड.  निलेश रातवडकर यांची भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने तळा भाजपला नवसंजीवनी मिळाली असून स्पष्टवक्तेपणा,परखड मत मांडणे यांसह कायद्याचे उत्तम ज्ञान असल्यामुळे विरोधकांनीही त्यांचा धसका घेतला असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.त्यांच्या निवडीने आगामी काळात तळा वासीयांचे प्रश्न मांडण्यासाठी खंबीर नेतृत्व मिळाल्याची भावना जनसामान्य नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे. भाजप तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने सर्व स्तरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी फोन च्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा