आरोग्य केंद्रातील पदनिर्मिती प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी.
तळा-किशोर पितळे
तालुक्यातील मौजे मांदाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी खुले होणार असून आरोग्य केंद्रातील पदनिर्मिती प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.मौजे मांदाड येथे सुसज्ज व आवश्यक सर्व सुविधा युक्त अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधकाम करून उभी आहे.परंतु या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांचा तुटवडा भासत होता. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण पंधरा पदांना मान्यता देण्यात आली असून त्यात पाच नियमित पदे तर दहा काल्पनिक पदे मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे (कुशल/अकुशल) घेण्यास मान्यता देण्यात आलीआहे.याठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना रुग्ण व्यक्तीला उपचारा साठी तालुक्याच्या ठिकाणी हलवावे लागत आहे. तसेच गरोदर महिलांना प्रसूती साठी रात्री अपरात्री हलवावे लागल्यास मोठी समस्या निर्माण होते.हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास येथील रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळणार आहेत.तसेच येथील नागरिकांची आरोग्याच्या बाबतीत होणारी गैरसोय दूर होईल.या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ मांदाड सह परिसरातील कुडे,रोवळा, वाशी, मजगांव खाजणी, काडणे, पिटसई, कासेवाडी, तारास्ते आदी गावांना होणार आहे.त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
Post a Comment