म्हसळ्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णसंखेत वाढ : आजपर्यंत ६६९ बाधीत ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२० %



(म्हसळा प्रतिनिधी )
म्हसळा तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या आजपर्यंत ६६९झाली, आज नवीन पॉझीटीव्ह रुग्ण ३ सापडले त्यामध्ये १ म्हसळा शहरातील २रुग्ण सकलप येथील आहेत. आज मयत वय ६८ (पु) निगडी येथील आहे.६५बाधीत रुग्णांपैकी ४२ रुग्ण घरी विलगीकरण राहून उपचार घेत आहेत तर ७ जण श्रीवर्धन, ११ जण म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत, तर ४ जण खाजगी रुग्णालयांत व १ कोव्हीड केअर सेंटर लोणेरे येथे उपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे.तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२०% आहे तर आज पर्यंत ३४ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
"तालुक्यात ४२ रुग्ण होम आयसोलेशन आहेत. अनेक रुग्ण  घरी विलगीकरण असतानाही सुप्रर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर म्हसळा ग्रामिण रुग्णालयात पालकमंत्री आदीती तटकरे यानी ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह ३० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ (डीसीएचसी) सुरू केले आहे त्याचा जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यासगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे."

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा