म्हसळा शहराचा "विकास मास्टर प्लॅन" तयार करणार खासदार सुनिल तटकरेंची म्हसळ्यात ग्वाही


म्हसळा शहराचा "विकास मास्टर प्लॅन" तयार करणार : सर्वांच्या सहभागाने मास्टर प्लॅनसाठी पालकमंत्री आदीती तटकरे घेणार बैठक .
खासदार सुनिल तटकरेंची म्हसळ्यात ग्वाही

संजय खांबेटे : म्हसळा
तालुक्यातील कोव्हीड रुग्णसंख्या कमी होत असतानाच म्हसळा शहरासह तालुक्याचा विकास कामांचा आढावा आज रायगडचे खासदार सुनिल तटकरे यानी म्हसळा पंचायत समीतीच्या सभागृहात घेतला. त्याचवेळी पत्रकारांजवळ संवाद साधताना तटकरे यानी लौकरच म्हसळा आम्ही शहराच्या विकासाचा मास्टर प्लॅन  तयार करणार आहोत सर्वांच्या सहभागाने पालकमंत्री आदिती तटकरे या बाबत बैठक घेणार आसल्याचे खासदार तटकरे यानी सांगितले यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष समिर बनकर,जि.प.चे पशु संवर्धन सभापती बबन मनवे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले,अलीशेठ कौचाली,नाजीम हसवारे उपस्थित होते.
   म्हसळा शहराचे मास्टर प्लॅन मध्ये,वाढीव व विस्तारीत नागरी वस्तीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा वितरण व्यवस्था, म्हसळा नळ पुरवठा योजने साठी अद्ययावत फिल्टरेशन प्लँट, अंर्तगत रस्ते व गटारे, शहरातील हिंगुळ डोह देवी स्थान विकसीत करणे, पर्यटनासाठी जानसई नदीपात्राचा उपयोग करणे या बाबत शहराचे सर्वेक्षण करण्या बाबत Expert Agency नेमून अद्ययावत आराखडा तयार करण्यात येणार आसल्याचे सांगितले.
   तालुका प्रशासकीय भवनासाठी जागेची उपलब्धता झाली असून त्याबाबत सुध्दा महत्वाचा निर्णय लौकरच घेण्यात येणार असल्याचे तटकरे यानी सांगितले. निर्सग चक्रीवादळांत नुकसान झालेल्या अंगणवाडी, शाळा गृह, ग्रामपंचायत ईमारतीच्या कामाचा आढावा घेऊन पावसानंतर लौकरच कामे पूर्ण होणार आसल्याची माहीती खासदार यानी दिली. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था बळकटी करणासाठी पालकमंत्री आदिती तटकरे प्राधान्य देत आसल्याचे तटकरे यानी सांगितले.आरोग्य विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येणार असल्याचे तटकरे यानी सांगितले.

म्हसळ्यातील लसीकरणा बाबत नाराजी
म्हसळा तालुक्यांत म्हसळा,मेंदडी व खामगाव या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामिण रुग्णालय म्हसळे येथे लसीकरण केंद्र सुरु आहेत. ग्रामिण भागांत लसीकरण बरे आहे, शहरांतील लसीकरण लक्षणीय कमी आसल्याबाबत खा. तटकरे यानी  नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा