पत्रकार सेवा संघ , अंकुर फाउंडेशन आणि सामाजिक वनीकरण तर्फे वृक्षरोपण, अन्न धान्यवाटप

 



सामाजिक जाणीवेतुन आदिवासी वाडीवर वृक्षारोपण व अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम


माणगांव प्रतिनिधी 


माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ यांच्या संकल्पनेतुन गतवर्षातील निसर्ग व तौक्ते चक्रीवादळांच्या पार्श्वभुमीवर आपल्या रायगड जिल्हा व तालुक्यातील गोरगरीब जनता तसेच वनसंपदेचे झालेले प्रचंड नुकसान पाहता तसेच कोरोना महामारीत ऑक्सिजनची अनन्यसाधारण महत्व पाहता आपल्या प्रत्येकाने एकतरी रोपटे लावले पाहीजे याच कर्तव्य भावनेतुन अंकुर फाउंडेशन लोणेरे आणि सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आणि आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाचा उपक्रम २३ जून, बुधवारी रोजी सकाळी ११ वाजता पन्हळघर बुद्रुक, आदिवासी वाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 

          अंकुर फाउंडेशन ही संस्था गेली तेरा वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला,क्रिडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी  जपून योगदान देत आहे. याच संस्थेच्या खांद्याला खांदा लावत नवनिर्मित माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ हा सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या समवेत पर्यावरणपर वृक्षारोपण व सामाजिक सहानुभूतीपूर्वक  आदिवासी बांधवांना अन्नधान्याच्या वाटपाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. 

         सदर कार्यक्रमासाठी गोरेगांव पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण नावले तसेच स्वदेश फाउंडेशनचे संचालक तुषार इनामदार यांची उपस्थिती लाभणार आ

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा