म्हसळा तालुक्याच्या सर्वंकष विकासासाठी 7 कोटींचा निधी मंजूर - खा. सुनिल तटकरे


कोरोना प्रादुर्भावावर मात करण्यासाठी म्हसळा वाशियानी लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे - खासदार सुनिल तटकरे

म्हसळा -बातमीदार

कोरोना प्रादुर्भावाचे तिसऱ्या लाटेच्या धोक्याची शक्यता वर्तवली जात असताना कोरोना प्रादुर्भावावर मात करायची असेल तर प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे तसेच तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लोकांनी बाजरात किंवा सार्वत्रिक ठिकाणी गर्दी टाळून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आवश्यक ती काळजी घेतल्यास अधिकचा धोका टळू शकतो असे मत खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथे पत्रकारांजवळ वार्तालाप करताना सांगितले. कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरल्यावर प्रदिर्घ कालावधीनंतर म्हसळा तालुका पंचायत समिती विकास कामांचा आढावा बैठक घेऊन पत्रकारांजवळ संवाद साधताना तालुक्यातील सर्वकष विकासासाठी शासनाच्या वेगवेगळ्या निधीतून सुमारे 6 ते 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरची कामे आपल्या शिफारशीने व पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत, 30/54, डोंगरी विकास,जिल्हा परिषद आधी विकास निधींतून मंजुर केली आसुन या मध्ये शाळा गृह व अंगणवाडी दुरुस्ती, नवीन रस्ते,साकव बांधकाम, स्मशानभूमी सुधारणा, म्हसळा शहरातील मोठया रकमेच्या खर्चाची अंतर्गत रस्ते,पर्यटक विकासाचे दृष्टीने हींगुलडोह सुधारणा,शहरातील विस्तारित पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व जलशुद्धीकरण प्रकल्प,शासकीय इमारती बांधकाम,म्हसळा शहरातील दिघीरोड ते संकलप गाव अंतर्गत रस्ता आदी कामांचा समावेश असल्याचे सांगितले.खासदार,मंत्री आणि आमदारांनी म्हसळा तालुक्याच्या विकासाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून दिली आहे परंतु शहरात व ग्रामीण भागात पाहिजेत तशी दर्जेदार कामे होत नाहीत असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कामे सुस्थितीत होण्यासाठी यापुढे गांभीर्याने पाहिले जाईल असे सांगितले.मागील 20 वर्षात पडलेले विकासाचे ठिगळ भरून काढण्यासाठी काही कालावधी लागेल. विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही असे खासदार महोदयांनी ठामपणे सांगितले.म्हसळा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आसुन दोन दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा दौरा आसुन खासदार म्हणून मी तेथे उपस्थित असणार आहे त्या वेळी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या रिक्त पदांबाबतीत पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी देताना. कोरोना प्रादुर्भाला यशस्वीपणे मात देण्यासाठी म्हसळा तालुक्यात पालकमंत्री आदिती तटकरे यांचे विशेष प्रयत्नाने म्हसळा शहरासह,मेंदडी, खामगाव अशा तीन ठिकाणी लसीकरण केंद्र मंजुर केले आहेत.तालुक्यात लसीकरणाला ग्रामीण भागातील प्रतिसाद पहाता शहरात ते प्रमाण अवघे 20% इतके अल्प असल्याने खासदार सुनिल तटकरे यांनी चिंता व्यक्त करीत कोविड प्रादुर्भावावर मात करायची असेल  तर लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे तसेच खबरदारी घ्यावी म्हणून शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे अशी माझी  खासदार म्हणून जनतेला कळकळीची विनंती असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.म्हसळा तालुक्यातील ज्या नागरिकांना परदेशात जायचे आहे त्या त्या सर्व नागरिकांना आता लसीकरण करून घेता येईल त्या बाबतीत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.किरण पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता यांच्याकडे चर्चा केली असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले. म्हसळा पंचायत समितीचे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत पक्षाचे जेष्ठ नेते अलीशेट कौचाली,तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे,सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले,माजी सभापती नाझीम हसवारे,माजी उपनगराध्यक्ष सुहेब हलदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा