परीस स्पर्श... व्यक्तिविशेष महादेव गणपत म्हात्रे...!



टीम म्हसळा लाईव्ह

खरतर पत्र आणि माझा फारसा काही संबंध आलाच नाही मी किंवा माझ्या पिढी ने पत्र लेखन केले ते १० वी १२ वी च्या परीक्षेत मिळणाऱ्या मार्क्स पुरता. आजच्या पोरांना डिलिव्हरी बॉय म्हंटल की डोळ्यासोमर येतो तो अमेझॉन फ्लिपकार्ट, झोमॅटो किंवा मग स्वीगी ची बॅग घेऊन बाईक वरून फिरणारा एखादा....

पण पत्रांची डिलिव्हरी करणारे आमचे पोस्टमन काका कुठे तरी हरवले आहे. खरंतर ते हरवले नाहीतच आम्हीच पत्र लिहीन बंद केलंय. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आज काही टपाल दिन नाही जे की पत्रकलेखन, पोस्टमन आणि पोस्ट खात्या बद्दल लिहावंसं वाटतंय. आज च कारण जरा वेगळाच आहे. आज वाढदिवस आहे तो आमच्या पोस्ट खात्यात काम करणाऱ्या पोस्टमन काकांचा... श्री. महादेव म्हात्रे जी यांचा. आणि त्यामुळेच व्यक्ती विशेष या आपल्या सदरात आपण जाणून घेणार आहोत श्री महादेव म्हात्रे यांच्या बद्दल. 
बऱ्याचदा मला प्रश्न पडायचा तुम्ही पोस्ट खात्यात नसता तर...? मला वाटतं तुमच्या संपर्कात सहवासात आलेला प्रत्येक जण याच एकच उत्तर देईल की तुम्ही जरी कदाचित पोस्ट खात्यात नसला असता तरीही बेस्ट डिलिव्हरी पर्सन अशीच काहीशी तुमची ओळख निर्माण झाली असती. याच मुख्य कारण म्हणजे तुमच्या सहवासात आलेल्या प्रत्येकालाच तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं आहे. एखादा टपाल, पत्र जेव्हा पोस्टमन काकांच्या हातात येत तेव्हा ते योग्य पत्त्यावर पोचले जाईल याची खात्री असते. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात मदत होईल याची खात्री असतेच आणि तूम्ही ही सर्वतोपरी मदत करीत आला आहात. अगदी परीसा प्रमाणे लोखंडाचे सोनं करण्याची कला आपल्यात आहे. 
 एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर प्रकाश पाटील सर, लेखनाची आवड असेल तर जेष्ठ गझलकार शेख सर, कला क्षेत्रातील आवड असेल तर सुनील देव वैगेरे वैगेरे.... त्या त्या क्षेत्रातील जाणकारांशी आपली ओळख आणि मैत्री आहे. आणि या सगळयांशी असलेल्या जवळचे मैत्रीपूर्ण संबंध तुम्ही नेहमीच माझ्यासारख्या अडलेल्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ते नातेसंबंध योग्यरीत्या जपले आहेत. भेटलेल्या प्रत्येकाला त्यांच्यातील जमेची बाजू समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करत आला आहात आणि यापुढेही करत राहाल याची खात्री आहे. 
तूम्ही रायगड जिल्हा परिषदेच्या खरसई शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलंत. आणि त्यांनतर कित्येक वर्षे पोस्टखात्यात सेवा देत आहात. नोकरी सांभाळून प्रायोगिक रंगभूमीवर तुम्ही अनेक नाटकं केली आणि लोकांचं मनोरंजन करीत आला आहात. त्याच बरोबर तुम्हाला असलेली भजनाची आवड आणि त्यातच तुम्ही संगीतबद्ध केलेल्या भंजनांची आस्वाद फार कमी लोकांना घेता आला आहे. लवकरच ही मेजवानी ही आम्हा सर्वांना मिळेल हीच आशा. तुमच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला अगदी योग्य पत्त्यावर पोहचविण्यासाठी धन्यवाद आणि आपल्या वाढदिवसा निमित्त आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तुम्ही करीत असलेल्या कार्याला या शब्दा फुलांनी म्हसळा लाईव्ह च्या माध्यमातून सलाम...!

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा