(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहरात आज २२ जून रोजी ३० वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू झाला.तो शासनमान्य खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता.म्हसळा तालुक्यांत आता एकूण बाधीतांची संख्या ७४६ झाली तर उपचार घेणारे बाधीत ६५ रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.१३ आहे. आज २ रुग्ण कोरोना बाधीत सापडले. तर ८ कोरोना बाधीत रूग्ण बरे झाले. दिवसें दिवस ग्रामिण भागातील रुग्णसंख्या वाढत आसल्याने भितीचे वातावरण होत आहे. तालुक्यात आजपर्यंत ६४३ रुग्ण बरे झाले आहेत.६५ बाधीत रुग्णांपैकी ५१ जण घरीच विलगीकरण (Home Isolation) राहून उपचार घेत आहेत तर ५ श्रीवर्धन उप जिल्हा रुग्णालय, १माणगाव उपजिल्हा रुग्णालय,डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हसळ्यात ४, १ जण CCC लोणेरा येथे तर ३ खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे.तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.१३आहे.
"म्हसळा शहरांत ३० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ (डीसीएचसी) सुरू करण्यात आले आहे.तरी सुद्धा बाधीत राग्णांपैकी तब्बल ८०% रुग्ण घरीच विलगीकरण (Home Isolation) करतात यामुळे संक्रमणात वाढ होत असावी"
Post a Comment