निलेश मादांडकर, सरपंच खरसई
कोरोनाच्या महाभयंकर प्रादुर्भाव बरोबरच नैसर्गिक चक्रीवादळ /अवकाळी पाऊस लॉकडाऊन अशा विविध समस्येबरोबर महागाई .......
बँका भरमसाठ वीज
बिल अशा विविध समस्येतून सर्वसामान्य माणूस भरडला जातोय.
खाद्यतेल /गँस /पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले असताना बेरोजगारी ऊध्योग धंदे बंद यामुळे छोटे मोठे कर्जदाराचे जीवनजगणे मुश्किल झाले यात महावितरण व बँकवाले वसुलीचे अस्त्र उगारलेत अशात सर्वसामान्य माणसास रोजगार नाही यावर आवाज उठविण्यास लोकप्रतिनिधी निद्रिस्त झालेत.
रस्ते पाणी आरोग्य विकासकामे या पेक्षा श्रेयवाद व दौरे यात धन्यता मानतात एखादा कार्यक्रम तोंडसुरे बायपास ठेवले तर रस्त्यांची डागडुजी तरी होईल.
म्हसळा शहर ते तोंडसुरे पर्यंत प्रवास म्हणजे समुद्रावरची लाटेवर चालणारी होडी ...
कदाचित महागड्या गाड्यांना जाणवत नसतील पण बिचाऱ्या मोटरसायकल रिक्षा मिनिडोरचे प्रवासी लोकप्रातिनिधिना भावपुष्प अर्पण करीत असणार
श्रेयवादात गुंतलेल्याना या समस्येबद्दल आवाज उठवायलला वेळ नसावा कारण आपआपल्या दारी महाविकासाचे तोरण दारी लावल्याने आम जनतेचा आवाज उठवायला नेताच उरलेच नाही.
केंद्र -राज्य सरकार मधे समाविष्ट असणाऱ्यास जनतेचे प्रश्न सोडवीन्यास वेळच नाही.
सुज्ञनागरिक जाब विचारण्यास भाग पडतील या पेक्षा लोकप्रतिनिधीनो आम जनतेचा अंत पाहु नका....
शहर व परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर माती पसरणे, पाणी साचून राहणे, ठीक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. वाहने योग्य वेगाने चालविणे आवश्यक असून संबंधित यंत्रणांनी रस्त्यांची पाहणी करून आवश्यक तिथे दुरुस्ती करावी ही अपेक्षा!-निलेश मादांडकर, सरपंच खरसई


Post a Comment