प्रेसिडेंट रो. मयुर दिवेकर तसेच रो. सोहीत कांकरीया ,राकेश मोरे यांचा स्तुत्य पुढाकार
आ.अनिकेतभाई तटकरे यांच्याकडून उपक्रमाचे विशेष कौतुक
रोहा(वार्ताहर)
रोह्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातुन व रोटरी सदस्य तसेच शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सोहीत कांकरीया व राकेश मोरे यांच्या आर्थिक योगदानातून शहरातील 150 रिक्षाचालकांना कोरोना प्रतिबंधात्मक बॅनर प्रदान करण्यात आले.
तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रिक्षाचालक व प्रवाशी यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची नितांत गरज होती त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून हे कोरोना रक्षक बॅनर 150 रिक्षांमध्ये लावण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी दिली.
या प्रोजेक्टची एकूण किंमत अडतीस हजार इतकी असल्याचेही प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांनी सांगितले.
रविवार दिनांक 27 जुन रोजी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिक्षाचालकांना हे कोरोना रक्षक बॅनर देण्यात आले.
याआधी 18 जून रोजी देखील 150 कोरोना रक्षक बॅनर रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे रिक्षाचालकांना देण्यात आले होते.
यावेळी आ.अनिकेत तटकरे यांच्यासमवेत रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,रोटरी क्लब रोहा सेंट्रल प्रेसिडेंट मयुर दिवेकर,उपनगराध्यक्ष रिदवाना शेट्ये,गटनेते महेंद्र गुजर,नगरसेवक महेश कोल्हटकर,पोलीस उपनिरीक्षक शेगडे साहेब तसेच रिक्षा संघटना अध्यक्ष लिलाधर मोरे,रोटरी सदस्य राकेश कागडा,गणेश सरदार,सुचित पाटील,डॉ. कैलाश जैन,मनोज बोराणा,सोहित कांकरिया,रूपेश पाटील,परेश जैन,किरण लांडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे घेण्यात आलेल्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल आ.अनिकेत तटकरे यांनी क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर व सर्व सदस्यांचे विशेष कौतुक केले.
Post a Comment