म्हसळा (वरवठणे) येथील कोवीड केअर सेंटर बंद पडण्याचे मार्गावर ; ऑक्टोबर २० पासून आज पर्यंत एकही रुग्ण अँडमीट नाही.
"डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर"(डीसीएचसी) चे तालुक्यात नियोजन
संजय खांबेटे : म्हसळा
तालुक्यातील जिल्हा परिषदआरोग्य यंत्रणे ला व म्हसळा येथील ग्रामिण रुग्णालयाला कायम स्वरुपी वैद्यकिय अधिक्षक पद , पुरेसे कर्मचारी व तांत्रिक सुविधा द्याव्या त्याच बरोबरीने कोवीड केअर सेंटर सुरू करावे व आरोग्य यंत्रणेत विविध सुधारणा व्हाव्या म्हणून प्रेस क्लबने खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केला, शासनाने रवीवार दि.१८ ऑक्टोबर २० पासून म्हसळा (वरवठणे) आय.टी.आय मध्ये ४० खाटांचे कोवीड केअर सेंटर सुरु केले पण आज पर्यंत या कोवीड केअर सेंटरमध्ये तालुक्यातील एकही कोवीड पॉझीटीव्ह किंवा लक्षणे आसलेला रग्ण दाखल झाला नाही तर दुसरीकडे आज तालुक्यात एकूण कोवीड पॉझीटीव्ह रुग्ण ४७५, तर उपचार घेत आसलेले ५४ रुग्ण आहेत. वरवठणे येथील C.C.C.साठी वैद्यकीय अधिकारी २, स्टाफ नर्स ३,लॅब टेक्नीशीअन १,औषध निर्माता १,डाटा एंट्री ऑपरेटर १, सफाई कामगार ३ व सुरक्षा रक्षक ३ पदांची आवश्यकता आसल्याचे वरीष्ठाना कळविले आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी म्हसळा यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
म्हसळा तालुक्यात नैसर्गिक वातावरण चांगले आसल्याने कोवीड रुग्ण संख्या साधारण असतानाच तालुक्यातील गरीब कोवीड रुग्णांची सोय स्थानिक पातळीवर व्हावी हा प्रश्न प्रेस क्लबने लावून धरला होता. या सेंटरमध्ये कोरोना+ , कोरोना संशयित रुग्णाना कॉरेंटाईन करण्यासाठी किंवा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना संशयित म्हणून कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल असे नियोजित होते.
आता म्हसळा ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह २० ते ३० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची पहाणी ग्रामिण रुग्णालयांत पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यानी केली.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू झाले तर त्यामध्ये कोरोना रुग्णांना स्वतंत्र बेड, मोफत औषधोपचार, शरीराचे तापमान ऑक्सिजनची पातळी व रक्ताच्या तपासण्या, छातीचे एक्स-रे, गरजूंना ऑक्सिजन सुविधा,चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची व्यवस्था रहाणार आहे. असे समजते



Post a Comment