रोहा (वार्ताहर)
देशात व महाराष्ट्रात सध्या लसीकरणाची मोहीम जोरात सुरू असून रायगड जिल्ह्यातही लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा ह्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी रविवारी रोह्याच्या भाटे वाचनालयात पत्रकारांशी बोलतांना सांगितले,राष्ट्रवादी कॉंग्रेस रोहा व रोटरी क्लब रोहा सेंट्रल आयोजित रक्तदान शिबिराला त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी उपस्थित वार्ताहारांशी त्यांनी वार्तालाप केला व नागरिकांनी लसीकरणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला दिले.
यावेळी ना. आदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस रोहा,रोटरी क्लब रोहा सेंट्रल,रोटरेक्ट क्लब रोहा सेंट्रल यांचे रक्तदान शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनासाठी त्यांनी विशेष कौतुक केले तसेच सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकरराव पाटील,रोटरी क्लब रोहा सेंट्रल अध्यक्ष महेंद्र दिवेकर,उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर,शहर अध्यक्ष अमित उकडे,भाटे वाचनालय अध्यक्ष किशोर तावडे,गटनेते महेंद्र गुजर,नगरसेवक राजेंद्र जैन,चंद्रकात पार्ट,माजी नगरसेवक अजित मोरे,युवक अध्यक्ष सागर भोबड,युवा नेते निलेश शिर्के,अमित मोहिते ,रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे राकेश कागडा,गणेश सरदार,सुचित पाटील,निखिल दाते,सचिन कदम,मनोज बोराणा,डॉ. देवेंद्र जाधव,डॉ. कैलास जैन,रूपेश पाटील,डॉ. प्रथमेश बुधे आदींसह रोटरेक्ट पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब रोहा सेंट्रल,राष्ट्रवादी कॉंग्रेस रोहाचे सर्व पदाधिकारी,रोटरेक्टचे सर्व सदस्य,शासकीय रक्तपेढि अलिबागचे डॉ. दिपक गोसावी व टीम आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment