श्रीवर्धन शहरात पोलिसांची आरोग्य तपासणी


श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर

         सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या महामारी मध्ये संचारबंदी पासून नागरिकांना नियंत्रणात ठेवण्याचे कार्य पोलिसांमार्फत होत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक नाक्यांवर बंदोबस्तासाठी रात्रंदिवस सतर्क राहण्यास तत्पर असतात. आज सर्वत्र ठिकाणी इतर नागरिकांचे कोविड-19 चे लसीकरण चालू आहे. शासकीय कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर्स यांचे लसीकरण सुद्धा झाले आहे. परंतु लसीकरणाच्या एक ते दोन महिन्यानंतर पोलिसांचे आरोग्य कार्यक्षम आहे का? असा प्रश्न डॉ. मुकेश मिलिंद श्रीवर्धनकर व त्यांच्या पत्नी डॉ. अमृता मुकेश श्रीवर्धनकर यांना पडला.
         आरोग्य तपासणीची ही संकल्पना त्यांनी पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांना सांगितले व त्यांच्या परवानगीनुसार श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे सर्व पोलिसांचे मूलभूत आरोग्य तपासणी मोफत करण्यात आले. त्यांच्या ह्या अनोख्या संकल्पातून पोलिसांबद्दल ची काळजी, आदर व प्रेम व्यक्त होते. आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकडून  त्यांचे कौतुक केले जात आहे.

"डॉ. मुकेश श्रीवर्धनकर आणि डॉ. अमृता श्रीवर्धनकर यांनी आज पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचार्‍यांचे आरोग्य तपासणी केली. त्यांनी केलेल्या आरोग्य तपासणीचा फायदा नक्कीच पोलीस कर्मचाऱ्याला  होईल. मी पोलीस ठाण्याच्या वतीने व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. मुकेश श्रीवर्धनकर व त्यांच्या पत्नी डॉ. अमृता श्रीवर्धनकर यांचे आभार व्यक्त करतो."  श्री. प्रमोद बाबर (श्रीवर्धन पोलीस निरीक्षक)

"आपल्या सुरक्षितेसाठी पोलिस वेळोवेळी खंबीरपणे उभे असतात परंतु त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी आपणच घेतली पाहिजे ह्या हेतूने त्यांच्या मूलभूत आरोग्य तपासणीचा निर्णय आम्ही घेतला." डॉ. मुकेश श्रीवर्धनकर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा