बाबू शिर्के : म्हसळा
कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत म्हसळा तालुक्यात ग्रामीण भागातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.आज रोजी बाधीत रुग्ण संख्येत म्हसळा तालुक्यात 10 रुग्णांची भर पडली आहे तर मेंदडी येथील 60 वर्षीय पुरुष उपचार घेताना दगावला आहे.आज उपचार घेऊन 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.म्हसळा तालुक्यात खामगाव आणि वरवठणे ही गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरत आहेत.आज दिनांक 11 मे रोजी 10 रुग्ण कोरोना बाधीत सापडले आहेत त्यामध्ये खामगाव 2,वरवठणे 4,घुमगाव 3 आणि आगरवाडा येथील 1 रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.आज खामगाव येथील 4, खरसई 1 आणि म्हसळा येथील 2 असे 7 रुग्ण बरे झाले आहेत.उपचार घेत असलेल्यांमध्ये 31रुग्ण होम आयसोलेशन, श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात 17, कोव्हीड केअर सेंटर जसवली येथे 1 आणि 3 रुग्ण खाजगी दवाखान्यात ऍडमिट असल्याचे तालुका आरोग्य विभागाने माहिती दिल्या नुसार म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केले आहे. तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 488 इतकी नोंद झाली आहे. उपचार करून 414 रुग्ण बरे झाले आहेत तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्ण संख्या 20 झाली असल्याचे म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.
Post a Comment