ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र कन्या शाळेत होणार कार्यान्वित - मुख्याधिकारी मनोज उकिर्डे
बाबू शिर्के : म्हसळा
म्हसळा नगर पंचायतीने कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या पद्धतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती त्याच पद्धतीने नियंत्रण ठेवण्यासाठी दुसऱ्या लाटेत काही अनर्थ घडु नये यासाठी अधिक उपाययोजना म्हणुन म्हसळा शहरातील तालुक्याची मुख्य बाजारपेठत ग्राहकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता म्हसळा नगर पंचायत निमुळत्या जागेत दाटीवाटीने दुकानांची रचना असणारी भाजीपाला आणि मच्छीविक्री मार्केट अन्य ठिकाणी स्थलांतरित करणार असल्याचे तसेच म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र (vaccinet ward) रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी कन्या शाळेत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी माहिती देताना सांगितले.त्यांनी अधिक माहिती सांगताना म्हसळा नगर पंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अमित शेटगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत म्हसळा तालुक्यात नियंत्रणात असणारा कोरोना प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढु नये त्या बाबतीत काही उपाययोजना म्हणून बाजारपेठेत होणारी गर्दी नियंत्रणात आणने गरजेचे आहे यासाठी भाजी मार्केटिंग अंजुमन हायस्कूलच्या प्रांगणात तर मच्छी मार्केट दिघीरोड आणि पाभरे फाटा येथे हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.भाजीपाला विक्री करिता जागा उपलब्ध होण्यासाठी अंजुमन शाळा संस्थेच्या संचालक मंडळाकडे बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगताना मिरची गल्लीतील किराणा दुकानदारांनी दुकाना समोर मिरची पोते न ठेवता दुकानात मिरची विक्री करू नये असे निर्बंध घालण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी माहिती देताना सांगितले.म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णावर उपचारासाठी डेडिकेटेड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयाला भेट दिली असता जाहीर केले आहे आहे त्या मुळे येथील लसीकरण केंद्र कन्या शाळेत सुरक्षित स्थळी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.म्हसळा शहरातील तालुका बाजारपेठेत ही तालुक्यातील 81 गाववाडी वस्तीतील ग्राहकांसाठी मुख्य बाजारपेठ आसुन लॉकडाऊन कार्यकाळात शासन निर्बंधा नुसार केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत बाजरपेठे सुरू असते त्यामुळे म्हसळा बाजरपेठेत रोज खरेदीसाठी याहू गर्दी असते त्यातच म्हसळा बाजारपेठ निमुळत्या जागेत दाटीवाटीने वसलेली असल्याने कोरोना प्रादुर्भाव नियम पाळण्याचा दुकानदार किंवा ग्राहक यांनी कितीही प्रयत्न केला तरी तो शक्य होणार नाही असे चित्र असल्याने म्हसळा नगर पंचायतीने राज्यात लॉकडाऊन असे पर्यंत सुकी मिरची विक्री, भाजीपाला, मच्छी मार्केट मध्ये ग्राहकांची गर्दी होणार नाही अशा अन्य प्रशस्त जागेत स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी जाहीरपणे कळविले आहे.कोरोनाचे नियम पाळुन म्हसळा तालुक्यात प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
Post a Comment