महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग श्रीवर्धन यांच्या वतीने कोरोना संक्रमित रुग्णांसाठी मदतीचा हात



 श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर

       महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या  संकल्पनेतून रायगड जिल्हाध्यक्ष संजय निजपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. रक्तदान, अन्नदान, कोविड केंद्र व आर्थिक मदत, वैद्यकीय मदत इ. उपक्रम राबविले गेले आहेत.
      महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड तालुका श्रीवर्धन यांच्या सौजन्याने आतापर्यंत अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच हेतूने उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन, प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी व प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्लिपंचतन येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय साहित्याचे वाटप शिक्षक परिषद श्रीवर्धनचे अध्यक्ष जयवंत लाखन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
      उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे तळा, रोहा, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना पाणी व साबण उपलब्ध करून मिळावे असे आवश्यक बाबींची विचारणा केल्यानंतर डॉ. मधुकर ढवळे यांनी साहित्य वाटप करण्यास परवानगी दिली. पाणी बॉटल - १४०० नग, साबण - ३०० नग, फेस शिल्ड - ३५ नग, ऑक्सिमीटर - ८ नग, सॅनिटीझर  - १५ लिटर, मास्क - ८० नग, हॅन्ड ग्लोस - २०० नग. अशाप्रकारे सामाजिक बांधिलकी जपत शिक्षक संघटनेच्यावतीने दि. १० मे रोजी वरील वैद्यकीय साहित्याचे एकत्रितपणे बघता तिन्ही आरोग्य निधनाच्या ठिकाणी विभाजन करून वाटप करण्यात आले.
      ह्या वैद्यकीय साहित्य वाटपाच्या वेळी डॉ. मधुकर ढवळे व त्यांचे कर्मचारी वर्ग तसेच शिक्षक परिषद श्रीवर्धनचे अध्यक्ष जयवंत लाखन, कार्याध्यक्ष जगन्नाथ पवार, सचिव निलेश श्रीवर्धनकर, उपाध्यक्ष भिकू पांगारकर, केंद्रप्रमुख धर्मा धामणकर, प्रशांत वाणी, मंहमद तारेक त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या सीमा चव्हाण, अनुजा भुसाने, प्रियंका पुलेकर, प्रणाली पवार व इतर सहकारी उपस्थित होते.

"सध्या covid-19 रुग्ण पाहता त्यांना औषधोपचार शासनाकडून पुरविले जात आहे. या रुग्णांना सध्या पाणी आणि साबण या दोन वस्तूंची आवश्यकता होती ती गरज भागविण्याचे कार्य शिक्षक परिषद श्रीवर्धन या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मी धन्यवाद देतो."  डॉ. मधुकर ढवळे (वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन)

" शिक्षक परिषद श्रीवर्धन या संघटनेतून सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आम्ही करत असतो त्याच उद्दिष्टा तून सध्या चालू असलेल्या कोरोना रुग्णांसाठी आपल्या मदतीचा हात व्हावा या हेतूने पाणी, साबण व इतर साहित्यांचे वाटप आम्ही केले आहे." जयवंत लाखन (अध्यक्ष, शिक्षक परिषद श्रीवर्धन)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा