टिम म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील घोणसे येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर मौजे घोणसे, ता.म्हसळा येथील स.नं.60, क्षेत्र 0.91.0 हे.आर. पैकी 0.05.0 हे.आर. या सरकारी गोठण, ग्रामपंचायत देवघर यांच्याकडे निहीत असलेल्या शासकीय मिळकत या मिळकतीमधील 0-05-0 हे.आर.ही जमीन ग्रामपंचायतीकडून शासनाकडे पूर्नग्रहण करण्यात आली असून ही जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घोणसे, ता.म्हसळा करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची आहे.
Post a Comment