वाघाच्या दर्शनाने दांडगुरी परिसरात भीती : वनविभाग घटनास्थळी ; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन



दिघी प्रतिनिधी
 श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्री परिसरातील झुडपांमध्ये वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली . वनविभागाला कळवताच तात्काळ घटनास्थळी त्यांनी भेट दिली . तसेच वाघसदृश प्राणी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे . वाघाने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी परिसर म्हणजे जंगल क्षेत्राला जोडून असणारेगाव. थंड वातावरण असलेला परिसर म्हणून याठिकाणाला ऐतिहासिक प्रसिद्धी आहे . विशेष म्हणजे वाघ दिसल्याचे कळल्यापासून परिसरात आणखी दहशत निर्माण झाल्याने कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे . दांडगुरी , वाकलघर , आसुफ तसेच बोर्ला भागात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे . याभागात नदी देखील वाहत आहे त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे समजते . कोरोनाच्या दहशतीत आता वाघाचे दर्शन झाल्यामुळे नागरिक घाबरलेल्या स्थितीत आहेत . रात्री १० च्या सुमारास दांडगुरी परिसरात वाघ दिसल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांना देण्यात आली . लागलीच बोर्ली राऊंड पथकाचे बुरान शेख , प्रतीक गजेवार , एल . एम . गिराने यांनी घटनास्थळी भेट दिली व संशयित प्राण्याचे ठसे घेऊन वनविभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे . 


आम्ही घटनास्थळी गेलो असता , संशयित प्राण्याचे ठसे उमटले होते . तपासासाठी ठसे पुढे पाठवले आहेत . नागरिकांनी जागरूक राहावे. जनावरांना आपल्या गोठ्यात बांधून ठेवावे . या घटनेमुळे वनविभाग सतर्क राहील . -मिलिंद राऊत , वनपरिक्षेत्र अधिकारी , श्रीवर्धन 

गुरुवारी रात्रीच्यावेळी बाईकस्वाराने वाघ दिल्याचे सांगितले. आम्ही ही ताळत्का तिकडे गेलो असता , वाघ पळून गेल्याचे निदर्शनास आले , मात्र काळोख असल्याने पुढे गेलो नाही . तात्काळ वनविभागाला कळविले व अधिका-यांनी देखील भेट दिली . - ग्रामस्थ , दांडगुरी 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा