तळा- किशोर पितळे
तळा तालुका विकास कामाचा आढावा व तौऊक्ते वादळा पहाणी दौरा प्रसंगी तळा शिवसेना पक्ष कार्यालयात बैठक व पत्रकार परीषदेचे शनिवार दि २२मे रोजी आयोजित केलेल्या बैठकीत पक्ष कार्यकर्ते, शिवसैनिक, विभाग प्रमुख व पक्षावर दादागिरी करणाऱ्या वर जशास तसे शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईलअसा इशारा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिलजी नवगणे जिल्हा महीला संघटक तथा माजी नगरसेविका मुंबई प्रतिभाताई कंरजे, तालुका प्रमुख प्रध्दुम ढसाळ, उपतालूका प्रमुख शरदसारगे शहर प्रमुख राकेश वडके नगरसेवक नगरसेविका, कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते. मागील वर्षापासून कोविंड १९ सूरू असून लाँकडाऊन संचार बंदी, निसर्ग चक्रीवादळा पाठोपाठ तौऊक्ते वादळाचा जोरदार फटकापाच तालुक्यात बसला आहे.तर कोणाचे व्यवसाय, कोणाची नोकरी, गमावली आहे शेती हा एकमेवव्यवसायअसूनलाँकडाऊन मुळे आर्थिक परिस्थिती विस्कटून गेली असतानाच वीजवितरण कंपनी मोठ्या प्रमाणावर बिल वसूलीचा तडाखा लावला आहे, बँकाचे हप्ते थकले आहेत अशा परिस्थीत पैसे भरायचे कोठून? याबाबत आपण लक्ष घालावा वीज थकबाकी व बँक हप्ते भरण्यासाठी मुदत मिळावी अशी मागणी पत्रकार परीषदेत केली असता विचालेल्या प्रश्रांना उतर देताना म्हणाले कि उर्जा मंत्री व मुख्यमंत्री साहेबा जवळ चर्चा करून सोडविला जाईल. असे आश्वासन दिले. यावेळी तळा शहरातील वरचा मोहल्ला रस्त्याच्या कामाची पहाणी केली. तसेच तळा पोलीस ठाणे येथे भेट देऊन शिवसैनिकांवर पक्षाच्या कार्यकर्त्यावर नेहमी दुजाभाव ठेवून केसेस दाखल केली जाते एका पक्षालाच फक्त न्याय दिला जातो.त्यांच्या दबावाखाली काम करूनका हे कधीच सहन केले जाणार नाही.समान न्याय द्या. अन्यथा वेगळी भुमिका घ्यावी लागेल.आपले काही कर्मचारी नाहक त्रास देत आहेत.असे सहा.पोलीस निरीक्षक शिवराज खराडे यांना सांगितले.
Post a Comment