बाबू शिर्के : म्हसळा
केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ केल्याने देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.1200 रुपयांत मिळणारी खताची बॅग आता 2400 रुपयांत मिळत आहे.त्याच बरोबर पेट्रोल, डिझेल, गॅस च्या किंमती अव्वाच्यासव्वा झाल्या आहेत.पेट्रोलने शंभरी गाठली आहे.डिझेल शंभरीच्या वाटेवर आहे.त्यामुळे महागाईचा आगडोंब उडाला आहे.सिलेंडर गॅसच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याने सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्किल होऊन बसले आहे.गॅस दरवाढीमुळे "उज्वला गॅस योजनेचा बोजवारा उडाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा नीटपणे होत नाही त्यातही जनता त्रस्त आहे.नुकतेच झालेल्या तोक्ते वादळात कोकणात लाखोंच्या संख्येने घरादाराची पडझड झाली आहे. शेतकरी,बागायत दारांचे नुकसान झाले आहे असे असताना केंद्र सरकार राजकारण करत आहे. गुजरात राज्यात नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकारने 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेला उपेक्षित ठेवून केंद्र सरकार एक प्रकारे अन्याय करीत आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्र विज वितरण कंपनीने भरमसाठ वीजबिल वाढवून वसुलीसाठी तगादा लावला आहे.विज बिल न भरल्यास विज कनेक्शन कापण्याची कारवाई करण्यात येत आहे.राज्य सरकारने वाढीव विज बिलाबाबत निर्णय घेऊन सवलत देणे गरजेचे आहे.केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारवर करीत असलेल्या अन्याया विरोधात आणि राज्य सरकारने विज बिल सवलती मिळण्याकरिता तसेच केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांची किंमत कमी करावी,महागाईला आला घालावा,नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई द्यावी,खतांच्या किंमती कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक 24 मे रोजी राज्यभर जन आंदोलन करणार आहे आहे.तसे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष यांना दिले असल्याने म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक 24 मे 2021 रोजी तालुका शहरात सकाळी 9.30 वाजता शासनाच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी माहिती दिली आहे.
Post a Comment