सोबत फोटो- पाभरे ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरण मोहीम राबवताना सरपंच अनिल बसवत,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड,डॉ.प्रियांका देशमुख व आरोग्य कर्मचारी दिसत आहेत.
पाभरे ग्रामपंचायतीने दोन दिवसांत १७५ जणांना दिला कोव्हीशिल्डचा पहिला डोस
म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा तालुक्यात कोरोनाचा वेग थांबवण्यासाठी मोठ्याप्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेंतर्गत तालुक्यात ग्रामपंचायत स्थरावर लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे.
गुरवार दिनांक २० मे रोजी पाभरे ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरण केंद्राचे उद्घाटन सभापती छाया म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उप सभापती संदीप चाचले,पाभरे ग्रामपंचायत सरपंच अनिल बसवत,घोणसे ग्रामपंचायत सरपंच रेश्मा कानसे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड,डॉ.प्रियांका देशमुख व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.लसीकरणाच्या मोहिमेत तालुक्यातील पाभरे ग्रामपंचायत आपल्या हद्दीतील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात डोस देणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.पाभरे ग्रामपंचायती मध्ये २ दिवसांत १७५ नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोस देण्यात आला.या प्रसंगी कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे कोव्हीशिल्डचा पहिला डोस देण्यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध असल्याचे सरपंच अनिल बसवत यांनी सांगितले.
Post a Comment