तळा नगरपंचायतीने खरेदी केले तीन जनरेटर ; शहराला सुरळीत पाणी पुरवठा होण्यास होणार मदत.



तळा : किशोर पितळे
पाणी टंचाईच्या समस्येने ग्रासलेल्या तळा शहराला ऐन मे महिन्यात दिलासा मिळाला आहे.तळा नगरपंचायतीने १४ वित्त आयोगातील निधीतून ३६ लाखांचे तीन जनरेटर खरेदी केले आहेत ज्यामुळे तळा शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यास मोठी मदत होणार आहे.हे तीन जनरेटर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आंबेळी पंप हाऊस, धरण पंप हाऊस व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर असलेली पाण्याची टाकी येथे बसविण्यात आले आहेत.त्याची ट्रायल पण घेण्यात आली आहे.तळा शहराला आंबेळी लाईन व धरण लाईन येथून पाणीपुरवठा करण्यात येतो.मात्र पाणी पुरवठा सुरू असताना काहीवेळा विद्युत पुरवठा कमी दाबाने होत असल्या कारणाने सुरळीत पाणी पुरवठा होत नसत तसेच यामुळे पंप जळण्याचे प्रकार देखील घडले आहेत ज्यामुळे तीन ते चार दिवस शहराचा पाणीपुरवठा खंडित राहतो.यावर उपाय म्हणून नगरपंचायतीने स्वतःचे जनरेटर खरेदीकरावेअशी मागणीशिवसेना नगराध्यक्षा वनगरसेवक यांनी केली होती.त्यामागणीला यश आले असून तळानगरपंचायतीने १४ वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल ३६ लाखांचे तीन नवीन जनरेटर खरेदी केले आहेत.हे जनरेटर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तिन्ही ठिकाणी बसविण्यात देखील आले असून या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ऑटो स्टार्ट प्रमाणे १५ सेकंदामध्ये चालू होणार आहे.यामुळे तळा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असून दररोज किमान अर्धा तास शहराला नियमित पाणी पुरवठा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यापासून मुख्याधिकारी माधुरी मडके, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे,पाणी पुरवठा सभापती नेहा पांढरकामे, यांचेसहसर्वनगरसेवक,नगरसेविका व प्रशासनाने पाठपुरावा करून सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तळे रहिवाशांनी धन्यवाद दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा