श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
सध्या कोरोनाची सावट असताना सर्वत्र ठिकाणी मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झालेली दिसून येते. श्रीवर्धन नगरपालिकेकडून प्रत्येक पाखाडी व आळीमध्ये नालेसफाईचे काम जोरदार चालू आहे. नाल्यांमध्ये उगवलेले गवत, पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण करणारे दगड पूर्णतः साफ करण्याचे येत आहे. आज मितीस श्रीवर्धन शहरात बहुतेक ठिकाणी नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचे दिसते.
त्याच सोबत नागरिकांनी घरांच्या छपराचे कामांना सुद्धा सुरुवात केली दिसण्यात येते. चक्रीवादळाने काही घरांचे उडालेले पत्रे व कौल यांच्या डागडुजीचे काम चालू आहे. काही ठिकाणी नागरिक त्यांच्या आजूबाजूच्या धोकादायक झाडांना तोडण्यात येत आहे. जेणेकरून पावसाळ्यामध्ये तो झाड कोणाची जीवित हानी ठरू नये या हेतूने कामकाज चालू आहे.
बहुतांश दवाखाने, सरकारी कार्यालये, सामानांचे गोडाऊन या ठिकाणचे गळते पत्रे व इतर कामं करण्यात येत आहे. नगरपालिकेकडून आवश्यक अशा कामांना सुरुवात झालेली आहे. अशा रीतीने सर्वत्र ठिकाणी नागरिक पावसाळ्याच्या तयारीला लागले आहेत.
Post a Comment