धक्कादायक ! म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायती च्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला मारहाण.


संजय खांबेटे : म्हसळा 
तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला मारहाण  झाल्याचा प्रकार गुरुवार दि.६ मे रोजी सकाळी६ते ७ या वेळी घडला.याबाबत पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत भिंकू पयेर यानी म्हसळा पोलीसात रितसर तक्रार केली.
   याबाबत ग्रामपंचायत स्तरावर माहीती घेतली असता पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत हा नियमीत पद्धतीने एका भागाती ल पाणी बंद करून दुसऱ्या भागात सोडण्यास जात असत खरसई मोहल्या तील वसीम जहांगीर या युवकाने पाणी पुरवठा कर्मचारी चंद्रकांत याला आमच्या भागात पाणी सोडण्यास उशीर का झाला या वाबत विचारले,त्यानी संबंधीत व्हॉल मध्ये फेरफार केला व फिटरला तुला मारुका विचारून मारण्यास सुरवात केली. फिटरच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याचे ग्रामंपंचायत प्रशासनाने सांगितले.

"खरसई ग्रामपंचायत हदींत कोळी,आगरी, मुस्लीम,बौध्द समाज गुण्या गोवींदाने रहातो, गावांत उंच सखलता असूनही पाणी वितरण समान पातळीत करण्याचा प्रयत्न प्रशासन करते, किरकोळ कारणानी  ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला झालेली मारहाण निंदनीय आहे"
निलेश मांदाडकर,सरपंच ग्रा.पंचायत खरसई.



म्हसळा पोलीसांचा अजब कारभार :खरसई
पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला मारहाण: गुन्ह्याची माहीती देण्यास नकार

तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला मारहाण घडली. संबंधीत ग्रामपचायतीने पोलीसांकडे रितसर घटना नोंदविली पोलीसानी गुन्हा सुद्धा नोंदविला, घटनेचे गांभीर्य पाहून डी.वाय.एस.पी बापूसाहेब यानी घटनास्थळी भेट दिली. या माहीतीनुसार आज ७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास स्थानिक प्रेस क्लबचा प्रतिनिधी माहीती घेण्यास गेला असता तपासी अम्मलदार हे.कॉ.ब.रामदास गोवींद सुर्यवंशी ब.नं.९७३ यानी  प्रभारी आधीकाऱ्याना फोन वरुन विचारल्या शिवाय माहीती देता येणार नाही असे सांगून म्हसळा पोलीस स्टेशनचे स.पो.नी उध्दव सुर्वे याना फोनवर विचारून गुन्ह्या तील माहीती गोपनीय आहे ती पत्रकाराना देऊ नये आसे सांगितल्याचे सुर्यवंशी यानी प्रेस क्लबच्या प्रतिनीधीला सांगितले.
   या सर्व प्रकाराने म्हसळा पोलीस स्टेशनचे स.पो.नी उध्दव सुर्वे यांचा गोपनियतेचा आभ्यास वेगळ्या प्रकाराने केला असावा अशी चर्चा सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा