म्हसळा पोलीस भविष्यांत अनधिकृत व्यवसायाना करणार लक्ष : हातभट्टी दारु विक्रेत्यावर कारवाई.



संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा पोलीसानी अनधिकृत व्यवसायीक बेकायदेशीर देशी विदेशी व हातभट्टी दारु विक्रेत्यावर विशेष कारवाई सुरू करणार आहेत. आवश्यकता वाटल्यास एखाद्या प्रसंगी पोलीस स्वताच फिर्यादी होऊन संबधीत अनधीकृत व्यवसायीकावर गुन्हा नोंदविणार आसल्याचे समजते. नुकतेच म्हसळा पोलीसानी पाभरे येथे हातभट्टी दारु विक्रेता रमेश जर्नादन वेटकोळी यांवर गुन्हा दाखल केला आसल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे ठाणे अम्मलदार रामदास सुर्यवंशी यानी सांगितले.बाबत पोलीस हवलदार कमलाकर लक्कस यानी फिर्याद दिल्याने  म्हसळा पोलीस ठाण्यात मुंबई प्रो.का.क. ६५ (ई) अन्वये गुन्हा रजी नं २९ / २०२१ ने दि.७ एप्रिल रोजी २२.५७ ला दाखल केल्याचे सुर्यवंशी यानी सांगितले.यावेळी आरोपीकडे रु १००० किमतीची १० लीटर हातभट्टीची दारु रंगेहाथ मिळाली,सदर गुन्ह्याचा तपास महीला पोलीस नाईक स्वप्नाली पवार करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा