टीम म्हसळा लाईव्ह
शिरगाव कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी कोरोना काळात छत्र हरवलेल्या मुलांन संदर्भात एक निर्णय घेतला आहे . कोरोना काळामध्ये ज्या मुलांचे छत्र हरवले कोरोना काळामध्ये ज्यांचे ज्यांना आई - वडील गमावले त्या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय काडसिद्धेश्वर स्वामी यांनी घेतला . सध्या कोरोना ची दहाकता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे . यामध्ये संपुर्ण कुटुंबेच्या कुटुंब कोरोनामुळे आजारी पडत आहेत. कुटुंबातील करते पुरुष निघून जातात त्याच बरोबर घरातील पती - पत्नी सुद्धा यामध्ये मयत होत आहेत .यानंतर त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या लहान लहान मुलांचे खुप मोठे हाल होत आहे . याची जाणीव ओळखून कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी अशा कुटुंबांच्यावर ओढवलेल्या आघातामध्ये अशा मुलांना धीर देण्यासाठी कणेरी मठ पूर्णपणे यांच्या पाठीशी राहील. या अचानक अनाथ झालेल्या मुलांना चार पाच महिन्याच्या असलेल्या बाळा पासून अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारून आणि त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आणि त्यांचा सगळा सांभाळ करून त्याला पूर्णपणे स्वावलंबी बनवून मठातून सोडले जाईल असे यावेळी काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले.
Post a Comment