तळा : किशोर पितळे
आज कोव्हीड 19 सारख्यामहामारीने थैमान घातलेले असताना याआजाराच्या भीतीनेच लोक जीव जातआहेत त्यातच अशा बरीचशी मंडळी कोव्हिड आजार झालेल्या लोकांचा तिरस्कार करीत आहेत त्यांच्या जवळ कोणी जात नाही तुच्छतेची वागणूक दिली जाते.त्यामुळे रूग्णाचे मानसिक खच्चीकरण होतअसते. हाआजार तसा पाहिलात तर धीर दिल्याने खरा बरा होतो उदाहरण सांगायचं झालं तर अलिबाग जिल्हा रुग्णालयात काम करणारे डॉक्टर विक्रमजीत पडोळे M D Medicine ,Physician ,Civil Hospital Alibag हे दिव्यांगांना पाहतातच आस्थेने त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस करतात त्यांना धीर देतात आणि त्यांच्यावर उपचार करतात आज सांगायचं झालं तर फक्त डॉक्टर यांनी खाद्यांवर हात टाकून तुम्ही बरे होणार असा धीर दिला तरी अर्धा रुग्ण बरा होतोय.या कोरोना रोगाचा मी देखील शिकार बनलो. खाजगी डॉक्टरकडे इलाज केला. प्रकृती साथ देत नव्हती अतिशय तब्येत बिघडली आणी सिव्हिल रुग्णालयात गेलो तेथे ही खुप गर्दी होती. काही सुचेना कोणी धड उत्तर देत नव्हते पण त्याच वेळेस मला पाहून डॉ.विक्रमजीत पडोळे देवासारखे धावून आले. आणि माझ्यावर योग्य वेळीच उपचार केल्यानेच आज मी कोरोना मुक्त झालो आहे. ईच्छाशक्ती प्रतिकारशक्ती आणी डॉ पडोळे यांनी मला दिलेला धीर यामुळे वेगळीच ऊर्जा मिळाली. माझ्या बरोबरच इतरही बराच दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांसाठी या कठीण परिस्थितमध्ये डॉक्टर पडोळे खरोखर देवदूत ठरत आहेत. जन सेवा हिच ईश्वर सेवा समजून कोरोना रूग्णासाठी अहोरात्र झटत आहेत. अशी प्रतिक्रिया जिल्हा दिव्यांग कर्मचारी संघटना अध्यक्ष साईनाथ पवार यांनी प्रतिनिधीशी व्यक्त केली. स्वतः कामाच्या वेळेव्यतिरिक्त देखील डॉक्टर विक्रमजीत पडोळे साईनाथ पवार यांच्या बरोबर दिव्यांगांसाठी कोव्हिड १९ व इतर वैद्यकीय समस्या बाबत मोलाचे काम करीत असून ४५ वर्षावरील सर्व दिव्यांग बांधवाना त्वरीत लस देण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली आहे असे सांगितले.
Post a Comment