म्हसळा तालुक्यातील खामगाव प्रा.आ. केंद्रातील लसीकरण केंद्राचे सभापती छाया म्हात्रे यांच्या हस्ते उद्द्घाटन



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळयातील खामगाव प्रा.आ. केंद्रातील   तिसऱ्या कोव्हीड लसीकरण केंद्राचे तालुका पंचायत समितीच्या सभापती श्रीमती छाया म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी सरपंच श्रीमती प्रियंका प्रसन्न निमरे,माजी सभापती श्रीमती उज्वला सावंत, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता पोटे व डॉ. गीतांजली हंबीर,श्रीम स्नेहलता खैरे, श्रीमती शितल भगतआरोग्य सेवक मंगेश चव्हाण,कैलास घरत, परिचर श्रीम प्रेषित सातनाक व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. खामगाव केंद्राला ४५० लस उपलब्ध आहे.आज १२० लाभार्थीना लसीकरण करण्यातआले.

" खामगाव प्रा.आ.केंद्राची व्याप्ती तालुक्या तील अन्य प्रा.आ.केंद्रांपेक्षा मोठी आहे,या केंद्रांतर्गत ४० गावे व १८५३९ लोकसंख्या येते, ४६अंगणवाड्या येतात, प्रशासन या प्रा.आ. केंद्राला जास्तीत जास्त मदत करील. या पंच क्रोषीतील जनतेने लसीकर  णाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा"
श्रीमती छाया म्हात्रे , सभापती पं.स. म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा