केलटे येथील मृत व्यक्तीच्या अंतविधी बाबत नवीन माहिती समोर : ग्रामस्थांनी केले कालच्या वृत्ताचे खंडन



म्हसळा प्रतिनिधी

कोरोना काळात प्रत्येक व्यक्तीला संकटाचा सामना करावा लागत आहे,असे असताना केल्टे बौध्दवाडी मध्ये काल एका नागरिकाचा मृत्यु झाल्याचे  समजताच केलटे मोठया गावातील नागरिकांनी त्या प्रेताची अंतविधी करण्यासाठी सरपंच व गावअध्यक्ष यांच्या सहकार्याने
संपूर्ण नियोजन केले. कालची घटना सोडून प्रत्येक क्षणी ग्रामस्थ मंडळ दुःखात प्रथम सहभागी होत असतात. कालच्या घटनेत आपला मोठेपणा जगास दाखण्याचे अट्टाहास करणारे समाजसेवक स्वतःला बडवतात हाच मोठा त्यांचा अंहकार असावा. हि वेळ पहिलिच नाही तर जगात प्रत्येक जन अंत्यसंस्कार करतात पण गावाला बदनाम करुन स्वताचे अस्तिव सिध्द करणारे  निस्वार्थी नसुन स्वार्थी आहेत असा टोला ग्रामस्थांनी लगावला.केलटे गावाची प्रथम रहाटी पाहावी नंतर गावाबदल लिखान करावे. गावाला बदनाम करणारी बातमी प्रकाशित करण्यात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याउलट ग्रामस्थांनी अंत्यविधी साठी पूर्ण मदत केली आहे,त्या मुळे ज्या ज्या वृत्तपत्रामध्ये व अन्य माध्यमातून खोटे वृत्त प्रकाशित झाले त्याचे आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्याच प्रमाणे आमच्या गावात कुणीही भांडण लाऊन गैरसमज पसरवण्याचे काम करू नये केलटे  हा गाव एकसंघ असून अर्धवट माहितीनुसार गावाची बदनामी करू नये असे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शांताराम कोबनाक,गणेश बोर्ले,श्रुतिका गिजे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा