श्रीवर्धन - तेजस ठाकूर
एकीकडे संचारबंदी चे नियम असताना घराच्या बाहेर पडण्यापेक्षा नागरिकांनी आपल्या शेतात व वाडी मध्ये मान्सून पावसाळा निमित्त स्वच्छतेची तयारी करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या शेतामध्ये व वाडीतले काम आवरण्याच्या कामात व्यस्त आहेत. काही ठिकाणी नागरिक घरांचे पत्रे व कौल दुरुस्तीच्या मार्गावर आहेत.
पावसाळ्यामध्ये शेतात लावणी निमित्त शेतातला कचरा काढणे व तिथली जमीन भुसभुशीत करणे हे सध्या सर्वत्र ठिकाणी पाहण्यास मिळते. शासनाने दिलेल्या नियमानुसार सकाळी ७ ते ११ मध्ये बाजार पेठ चालू असल्याकारणाने शेतकरी बांधव सकाळच्या वेळेत भाजीपाला विकून दुपारनंतर शेतात काम करण्यास वेळ मिळतो. एका अर्थी शेतातल्या कामांना वेळेचा फायदा असून विक्रीसाठी कमी वेळ मिळत असल्याने कुठेतरी नकारात्मकतेची भावना व्यक्त होत आहे.
३ जून रोजी झालेल्या चक्री वादळामध्ये मोडलेली घरे, उडून गेलेले पत्रे यांचे सुद्धा छोटी-मोठी उरलेले काम हे नागरिक उरकून घेण्याच्या कार्यात आहेत.
येत्या एक महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने आम्ही घराच्या छपरांचे काम करत आहोत. मागच्या वर्षी वादळामध्ये घर मोडल्याने यावर्षी पूर्ण घर बांधण्याची तयारी चालू आहे. -कमलेश राटाटे (नागरिक)
"मे" महिना सुरू झालेला आहे लवकरच पावसाचे चिन्ह दिसत असल्याने आम्ही शेतातल्या कामांना सुरुवात केली आहे. एकंदरीत बघता वर्षाचे १२ महिने शेतात काम असतात. परंतु मागच्या वर्षीच्या वादळाने उन्मळून पडलेली झाडे त्यामुळे अधिकच कामांना भर पडलेली आहे. -ओंकार पारटे (शेतकरी युवक)
Post a Comment