फोटो : अे.पी.आय.सुदर्शन गायकवाड , प्रमोद कदम, पो.नाईक स्वप्नाली पवार
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पाभरे तांबडी, घोणसे म्हशाची वाडी या गावचे हद्दींत डिसेंबर २०१५ ते दि.३/१२/२०१७ चे दरम्यान घडली. सदर घटनेचे गांभीर्य व नियमानुसार तपास श्रीवर्धनचे विद्यमान उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.बापूराव पवार यांचेकडे होता, त्याना म्हसळापोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सपोनी सुदर्शन गायकवाड व कर्मचारी तपास कामात मदत करीत होते त्यामुळे म्हसळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन व विद्यमान सर्वअधिकारी कर्मचाऱ्यांचे म्हसळाकर कौतुक करीत आहेत.
यातील पिडीत फिर्यादी व तिची पिडीत बहिण, आदिवासी समाजाचे असून आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण (रा.पाभरे) याचेकडे आंब्याच्या बागेमध्ये राखणी करण्याच्या कामावर होत्या आरोपी याने फिर्यादी हिस मारहाण करून तिच्या मुलाला व आजीला मारून टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वेळोवेळी पाभरे तांबडी,घोणसे म्हशाची वाडी येथे शारिरीक संबंध प्रस्थापित केले, त्यातून ती गरोदर राहीली असताना तिचा गर्भपात घडवून आणला. तसेच आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण (रा.पाभरे) याने फिर्यादीच्या लहान बहीणी सोबत सुध्दा लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीने म्हसळा पोलीसांत तक्रारीत सांगितले होते अखेर युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण याला जन्मठेप झाली व शिक्षेमुळे म्हसळा पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलीस तपास कामातील मदतनीस"अे. पी. आय. सुदर्शन गायकवाड, प्रमोद कदम, शामराव कराडे, भास्कर मेंगाळ, आर्यशील मोहीते, स्वप्नाली पवार"
यानी केले म्हसळा पोलीसांचे कौतुक
"माजी सभापती महादेव पाटील, हिंदू समाज अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेठ करडे, जैन समाजाचे अध्यक्ष सुरेश शेठ जैन, योगेश करडे, सुरेश कुडेकर,आदीवासी सामाजिक नेते यशवंत पवार, कांतीभाऊ जैन, महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ. अर्पणा ओक, अनिशा करडे, तन्वी करडे " आदीनी म्हसळा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
Post a Comment