आज म्हसळयातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांत १२ ने वाढ तर २ बरे झाले : ग्रामिण भागातील रुग्ण संखेत होते वाढ.



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यांत बाधीतांची संख्या ४६८ झाली तर उपचार घेणारे बाधीत ५४ रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी पत्रकांत म्हटले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४०आहे.आज तब्बल १२ रुग्ण कोरोना बाधीत सापडले, त्यामध्ये म्हसळा ४,खामगाव ३, कणघर, आंबेत, गोडघर, घोणसे प्रत्येकी १ रुग्ण बाधीत आहेत. ग्रामिण भागातील रुग्णसंख्या वाढत आसल्याने तालुक्यात भितीचे वातावरण आहे.आज म्हसळा व गोंडघर येथील प्रत्येकी एका रुग्णाने कोरोनावर मात केली आसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. ५४ बाधीत रुग्णांपैकी ३६ जण घरीच विलगीकरण राहून उपचार घेत आहेत तर ७ श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय, ४ माणगाव उपजिल्हा रुग्णालय,तर ७ खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे.तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४० % आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा