म्हसळा तालुक्यातील खामगाव प्रा.आ. केंद्रात लसीकरण केंद्राला आजपासून होणार सुरवात.


संजय खांबेटे : प्रतिनिधी 
म्हसळा तालुक्यात प्रा.आ.केंद्र मेंदडी व ग्रामिण रुग्णालय म्हसळा ही दोनच कोव्हीड १९ लसीकरण केंद्र होती. तालुक्याचे भौगोलीक रचनेप्रमाणे व केंद्र शासनाचे निकषाप्रमाणे प्रा.आ.केंद्र खामगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करावे या लोकप्रतिनिधी व स्थानिकांसह म्हसळा लाईव्ह च्या जोरदार मागणीमुळे शासन गुरुवार दि. ६ मे पासून खामगाव प्रा.आ. केंद्रात लसीकरण केंद्राला सुरवात करणार आहे. या प्राथमिक आ.केंद्राचे कार्यक्षेत्रांत खामगाव, वावे, आंबेत ही तीन उपकेंद्र व ४२ गावे येतात. या लसीकरण केंद्रावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता पोटे व डॉ. गीतांजली हंबीर या प्रमुख असणार आहेत.त्यांच्या निरीक्षणा खाली ४५ वर्षाचे पुढील नागरिकाना लसीकरण होणार आहे, लाभार्थीला आधार कार्ड व त्याला लींक असणारा मोबाईल सोबत आणणे जरुरीचे आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम या प्रमाणे सकाळी १० ते सायं ५ या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा