श्रीवर्धन विशेष प्रतिनिधी : कोमल पवार
कोविड-१९ विषाणूमुळे जगभरात लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले. आणि विद्यार्थ्यांना कोरोना ची लागण होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शाळा बंद करण्यात आल्या. शाळा बंद असली तरी सुद्धा शिक्षण सुरू राहिले पाहिजे यासाठी सर्व देशात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे.
घरी राहून शिक्षण म्हणजेच ऑनलाइन शिक्षण ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य सरकारने काही संशोधनांची माहिती उपलब्ध करून दिली.
लॉक डाऊन च्या काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू असे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे वाटत असले तरी भारतासारख्या देशात हा पर्याय सगळ्याच मुलांसाठी लागू होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षण हे काही मोजक्याच आणि ठराविक विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे. कारण आजकाल ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वांकडे मोबाईल किंवा ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी सुखसुविधा असेल असे नाही. म्हणून काही ठराविक आणि मोजक्याच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. रोजंदारीवर काम करणारी लोक ज्यांना शिक्षण घेणे परवडत नाही अशा लोकांनी कसे ऑनलाइन शिक्षण घ्यायचे.? गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा किंवा शिक्षण घेता येने सहजासहजी शक्य दिसत नाही . सरकारने जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, सरकारी योजना म्हणून ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले तरच सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होईल.
ऑनलाइन शिक्षण हे आव्हानात्मक आहे.
ऑनलाइन शिक्षण हे कोरोना काळात तरी फायदेशीर आहे. कारण ही परिस्थिती किती काळ राहील सांगू शकत नाही. घरी बसून रोजचे काम करून आपल्याला शिकता येते. शिवाय इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला शिकता येतात. हातातल्या मोबाईलचा चांगल्या कामासाठी वापर होतो. शिवाय कोरोनासारख्या महामारीमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. याची खात्री आहे. या सर्व दृष्टिकोनातून वाटते की ऑनलाइन शिक्षण चांगले आहे.
ऑनलाइन शिक्षण घेताना त्यातून किती ज्ञान आपण घेतो ? परीक्षेला काय विचारणार? किती लिहायचे? याबाबत विद्यार्थी अजूनही साशंक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळेत समोर शिक्षकांनी समजवलेला मजकूर कळायला वेळ लागायचा त्यांना मोबाईलवर शिकवलेलं किती कळेल हा अनुत्तरीत प्रश्न आहे. कालपरवापर्यंत जो मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातात असता पालकांना त्रास होत होता तोच मोबाईल आज विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय ही बाब निश्चितच सुखद आहे.
Post a Comment