संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत बाधीतांची संख्या ४४९ झाली तर उपचार घेणारे बाधीत ४० रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.८५ आहे. आज तब्बल १० रुग्ण कोरोना बाधीत सापडले, त्यामध्ये खामगाव २,सोनघर१,सावर १,भापट येथील ६ रुग्ण बाधीत आहेत.ग्रामिण भागातील रुग्णसंख्या वाढत आसल्याने भितीचे वातावरण होत आहे.आज सुरई,मेंदडी व मांदाटणा येथील प्रत्येकी एका रुग्णाने कोरोनावर मात केली आसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. ४० बाधीत रुग्णांपैकी २७ जण घरीच विलगीकरण राहून उपचार घेत आहेत तर ३श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय,३माणगाव उपजिल्हा रुग्णालय,तर ७ खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे.तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.८५ आहे.
Post a Comment