तळा : किशोर पितळे
देशात कोरोना महामारीचा वाढता उद्रेक पाहता महाराष्ट्र शासनाने राज्यात लाँकडाऊन व संचारबंदी कडक र्निबंध लावले असुन सकाळी ७ ते११ या वेळेत जीवनावश्यक किराणा सामान,चिकन मटण, मच्छी, भाजीपाला,फळ,वडा पाव स्टाँल,यांना परवानगी असून शासनाचे नियमांचे पालन करण्याची बंधन घातलीआहेत मात्रअत्यावश्यक सेवा वगळून ११नंतर बाजारपेठ पुर्णपणे बंद करावी असे असून तळा शहरात शासनाच्या नियमांचे कोणीही पालन करताना दिसत नाही. बाजारपेठ सकाळी ७ते ११पर्यंत खुली असल्याने प्रंचड गर्दी दिसून येतअसून प्रत्येक जण शासनाच्या आदेशाचे पायमल्लीझालेलीदिसून असून किराणा,फळ,भाजीदुकान, बँक ऑफ इंडिया,येथे प्रचंड गर्दी करून शारीरिक अंतर नबाळगता तर काही मास्क वापर करताना दिसून येत नसून पोलीस प्रशासन गर्दी नियत्रंण आणण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीस लागली आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत जशी काळजी घेतली जात होती तशी आता मात्र नागरिक फारशी काळजी घेताना दिसून येत नाही.पोलीस प्रशासनाकडून वाहनांचीतपासणी आणी वाहन चालकांची चौकशी करण्यात येत असली तरी त्याला नागरिक जुमानत नसल्याने शासकीय नियमांचे पालन होताना दिसत नसल्याचे चित्र समोर येत आहे. मागील वर्षी कोरोना महामारी व संक्रमण यामुळे स्थगिती दिलेल्या लग्न समारंभ हळदी समांरभ गावकीची,भावकीची पुजा, गोंधळ,इतर धार्मिक कार्य होत असतानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे काटेकोरपणे दुर्लक्ष होतअसल्याचे दिसून येत आहे.नागरिकांचा बेफिकिरीपणाशासनाचीडोकेदुखी वाढताना पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासन,पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासनावर ताण वाढताना दिसून येत आहे.मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तालुक्यातील विसावलेली १८३ कोरोना रुग्ण संख्या २६०च्या पुढे जाताना दिसुन येत आहे.
Post a Comment